तलवार हल्ल्यात तरूण गंभीर; 9 जणांवर गुन्हा

कोल्हापुर येथील राजेंद्रनगरातील घटना; तरूण गंभीर जखमी
तलवार हल्ल्यात तरूण गंभीर; 9 जणांवर गुन्हा

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजेंद्रनगरात झालेल्या तलवार कोयता हल्ल्यात तरूण गंभीर (crimecase) जखमी झाला. शिवनाथ नवनाथ सकट (वय ३२) असे त्या जखमींचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात (rajarampuri police station) नऊ संशयितांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे - धिरज देवकर, मिथुन काकडे, विकास देवकर, अक्षय रास्ते, चरण, रोहीत (सर्व रा. राजेंद्रनगर परिसर) आणि त्यांचे तीन साथिदार अशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवनाथ सकट हे राजेंद्रनगरात राहतात. ते सेंट्रींगचे काम करतात. काही वर्षापूर्वी त्यांचे संशयित विकास देवकरशी भांडण झाले होते. सकट हे मंगळवारी (१) रात्री दहाच्या सुमारास जेवण करून रिक्षा थांब्याजवळ फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान पूर्वी झालेल्या भांडणाचा राग धरून संशयितांनी भांडण काढले. त्यांच्यावर तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात सकट हे गंभीर जखमी झाले. याबाबत सकट यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार धिरज देवकर, मिथुन काकडे, विकास देवकर, अक्षय रास्ते, चरण, रोहितसह अन्य तिघांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम सुरू केली. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तलवार हल्ल्यात तरूण गंभीर; 9 जणांवर गुन्हा
Video - लाडक्या ताईच्या पाठवणीसाठी भावांची भन्नाट 'आयडिया'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com