esakal | तपासाबात नातेवाईकांची नाराजी; मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in kolhapur

अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू 

 

तपासाबात नातेवाईकांची नाराजी; मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आंबेवाडी फाट्याजवळ अज्ञात मोटारीने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. साबीर सनदी (वय 26, रा. बीडी कॉलनी परिसर, सानेगुरूजी) असे त्यांचे नाव आहे. या अपघाताचा तपास होत नसल्याबद्दल नातेवाईकांनी नाराजी व्यक्त करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. तसा राजारामपुरीत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तपासाबाबत अश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

सानेगुरुजी वसाहत येथील साबीर सनदी हे निर्जंतुकीकरणाचे काम करतात. ते बुधवारी (ता.4) काम करून मोटारसायकलवरून रात्री मित्रासोबत मोटारसायकलवरून घरी जात होते. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर आंबेवाडी फाट्याजवळ अज्ञात मोटारीने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सेवा रूग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आज सकाळी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी राजारामपुरी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा- कोरोनामुळे कुटुंबीयांशी दूर असलेल्या बंदिजनांची अशी  होणार भेट -

घटना घडल्यानंतर या अपघाताचा तपास पोलिसांकडून झाला नसल्याबद्दल त्यांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. घटनास्थळी राजारामपुरी पोलिस दाखल झाले. पण ही घटना घडल्यापासून करवीर पोलिसांनी त्याची योग्य ती दखल घेतली नसल्याचा आरोप नातवाईकांनी केला. तसेच याठिकाणी करवीर पोलिस दाखल झाले. त्यांच्याशी रहीम सनदी यांनी चर्चा केली. अपघाताच्या घटनेचा लवकर तपास करण्याचे पोलिसांकडून आश्‍वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 


संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top