esakal | शुल्लक कारणावरुन मित्रानेच केला घात; तरूणाचा भोकसून खून
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रीत लायटींग लावण्याच्या कारणारून खेबवडेत तरूणाचा खून

खबरदारीचा भाग म्हणून गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. मृत वैभव भोपळे यांचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.

नवरात्रीत लायटींग लावण्याच्या कारणारून खेबवडेत तरूणाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदगाव : खेबवडे (ता. करवीर) येथे नवरात्रोत्सवात लायटींग लावण्याच्या कारणावरून तरूणाचा भोकसून खून करण्यात आला. वैभव साताप्पा भोपळे (वय २२, रा. खेबवडे) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान संशयित पोलिस ठाण्यात हजर झाला. याबाबतची नोंद करण्याचे काम इस्पूर्ली पोलिस ठाण्यात सुरू आहे.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैभव भोपळे हे खेबवडेत कुटुंबासोबत राहत होते. ते एमआयडीसीत नोकरीला होते. गावात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामातेचा उत्सव सुरू आहे. या उत्सवात वैभव यांनी पुढाकार घेतला होता. गावातील सूरज साताप्पा पाटील (वय २५) याचा साऊंड सिस्टीम व लायटींगचा व्यवसाय आहे. संबधित मंडळाने त्यांची साऊंड सिस्टीम व लायटींग घेतली नाही. याचा राग सूरजला होता. याच कारणातून त्याने शुक्रवारी वैभव यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याने वैभव यांना भोकसले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसा गावात तणाव निर्माण झाला.

हेही वाचा: '... तर जनता बुडाखालील खुर्च्या काढून घेईल'

इस्पूर्ली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान संशयित सूरज पाटील हा स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. खबरदारीचा भाग म्हणून गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. मृत वैभव भोपळे यांचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यांना तीन महिन्याची मुलगी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

दोघे चांगले मित्र...

वैभव भोपळे आणि संशयित सूरज पाटील हे एकाच गावातील असून ते चांगले मित्र होते. शुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: सही मराठीत असल्यास मोजावे लागतात 500 रुपये

loading image
go to top