esakal | '... तर जनता बुडाखालील खुर्च्या काढून घेईल'; शेट्टींचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti

पूर्वीचीच रग लोकांमध्ये आहे याची जाण ठेचून या सन्मानाला ठेच लावण्याची भूमिका वरिष्ठ पातळीवर घेतली गेली तर..

'... तर जनता बुडाखालील खुर्च्या काढून घेईल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिरोळ तालुका हा क्रांती करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. पूर्वीचीच रग लोकांमध्ये आहे याची जाण ठेचून या सन्मानाला ठेच लावण्याची भूमिका वरिष्ठ पातळीवर घेतली गेली तर शिरोळ तालुक्यातील जनता त्यांच्या बुडाखालील खुर्च्या काढून घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. यड्राव (ता. शिरोळ) येथे गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ ठरावधारक आणि कार्यकत्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

हेही वाचा: सही मराठीत असल्यास मोजावे लागणार 500 रुपये

गणपतराव पाटील म्हणाले, ‘‘दत्त कारखान्याच्या माध्यमातून जमिनीतील सदिय की बारणे कमी खर्चात दोनशे टनापर्यंत ऊस उत्पादन घेणे महापूर बाधितामध्ये आबा विकू, पेरू, बिट अशा नवीन पर्यायाचा विचार करण्यासाठी या मार्गदर्शनाखाली प्रयोग सुरू आहेत. या सर्वाचा कायदा शेतकयाना यावा या उद्देशाने आपण काम करीत आहोत. या कामाला पातळ माल्यास शिरोळ तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.’’

हेही वाचा: शिरोळमध्ये राजकारणाचे नवे वळण; ज्यांच्याशी संघर्ष, त्यांच्यासाठी मैदानात

माजी आमदार उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद बाधकाम सभापती सावकर मादनाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, भाजप नेते अनिलराव यादव, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राष्ट्रवादीचे नेते चंगेजखान पठाण, राम शिंदे, आण्णासाहेब पाटील, विनया घोरपडे, भरत बँकेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, राजगोंडा पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, दामोदर सुतार,दळवी, दत्त कारखान्याचे संचालक रणजित कदम, शेखर पाटील, विश्वनाथ माने, महेद्र बागे, महादेव राजमाने, अमरसिंह निकम, सदाशिव पोपळकर, दरगू गावडे उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यानी आभार मानले.

loading image
go to top