esakal | पालकांनो सावधान ! तुमची मुलं नाहीत ना, फाळकूटदादांच्या संर्पकात ?
sakal

बोलून बातमी शोधा

crime cases increased in corona period and this effects on children mind in kolhapur

फाळकूटदादांना  वेळीच आवार घाला, अशी मागणी चिंताग्रस्त पालकांच्यातून होत आहे. 

पालकांनो सावधान ! तुमची मुलं नाहीत ना, फाळकूटदादांच्या संर्पकात ?

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : कारण क्षुल्लक असले तरी कोणा एकाला तरी तुडवून भागात दहशत निर्माण करणाऱ्या फाळकूटदादांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातून शहरासह ग्रामीण भागातही हाणामाऱ्यांपासून थेट खुनापर्यंतचे प्रकार वाढू लागलेत. फाळकूटदादांना  वेळीच आवार घाला, अशी मागणी चिंताग्रस्त पालकांच्यातून होत आहे. 

हेही वाचा - कोल्हापुरकरांनो सावधान ; मास्क न घालणाऱ्यांवर आहे सीसीटीव्ही वॉच

भागात आपला वट हवाच, ही वृत्ती सध्या वाढू लागली आहे. हा वट निर्माण करण्यासाठी फाळकूटदादा लोक नेहमीच प्रयत्नशील असतात. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गल्लीबोळात सध्या टोळक्‍यांची संख्या वाढू लागली आहे. ‘आरे’ म्हणायचा अवकाश आता त्याला ‘कारे’ने लगेच उत्तर दिले जाते. शहर परिसरात क्षुल्लक कारणावरून गेल्या दीड महिन्यात हाणामाऱ्यांचे प्रकार घडले आहेत. त्याचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. सदरबाजार परिसरात एका मद्यपीने स्टंपने एकास बेदम मारहाण केली. लोणार वसाहत येथे कामगार घेऊन गेल्याच्या कारणावरून चौघांनी एकाला काठीने मारहाण केली. कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या वॉर्डबॉय व त्याच्या भावावर साळुंखे पार्कवर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला.

केर्ले येथे जाब विचारल्याच्या कारणावरून दोन कुुटंबे एकमेकांना भिडली. दोन दिवसापूर्वी यादवनगरात जाब विचारल्याच्या कारणावरून दगडफेकीसह वाहनांची मोडतोडीचा प्रकार चौघांनी केला. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. गवताच्या काणावरून कुरूकलीत कोयत्याने वार करून तरूणाचा निर्घृण खून झाला. आपले शिक्षण झाले नाही. मुलांना शिकवायचे, त्यांचे करिअर उज्ज्वल बनवायचे या उद्देशाने प्रत्येक पालकांची धडपड सुरू असते. कोरोना संकटाने महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. परिणामी कट्ट्यांवरील मुलांचे घोळक्‍यात भर पडू लागली आहे.

हेही वाचा -  कोल्हापूर परिक्षेत्रात मोका कारवाईने क्राईमरेट कंट्रोल 

शुल्लक कारणावरून सध्या घडणाऱ्या हाणामाऱ्यात आपली मुले अडकतील? त्यांचा त्यात सहभाग नसतानाही कोणी त्यांना अडकवेल का? गुन्हा दाखल झाला तर त्याचे शैक्षणिक करिअर बरबाद होईल का? अशी धास्ती आज पालकांना लागून राहीली आहे. वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या फाळकूटदादांचा जर मुसक्‍या वेळीच आवळल्या तर ही भीती दूर होईल. त्यासाठी पोलिस यंत्रणेने पुढाकार घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांच्यातून केली जात आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top