KDCC Bank Election Update: पिवळ्या, भगव्या फेट्यांनी गारगोटीत मतदान केंद्रावर गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Bank Election

पिवळ्या, भगव्या फेट्यांनी गारगोटीत मतदान केंद्रावर गर्दी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Kolhapur DCC Bank)(केडीसीसी) बँकेच्या गारगोटी (Gargoti) येथील मतदान केंद्रावर चुरशीने मतदान होत आहे. सत्तारूढ गटाच्या ठरावदार मतदारांनी पिवळे फेटे तर विरोधी गटाच्या ठरावदारांनी भगव्या टोप्या परिधान करून चुरशीने आणि खेळी-मेळीत मतदान केले.

मतदान केंद्राबाहेर मतदारांसमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहेत. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपापल्या गटाने स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सत्तारूढ काढून माजी आमदार के. पी. पाटील (K.P.Patil)व गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील (Ranjit Singh Patil) तसेच विरोधी गटाकडून आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar)आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांचे स्वागत करत आहे. सकाळपासून या मतदान केंद्रावर ती मतदारांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा: KDCC Bank Election: ठाकरेंच्या जीवावर कोल्हापुरात काँग्रेसची चैनी

शाहूवाडीत १o वाजेपर्यंत ९९पैकी २२ टक्के मतदान झाले. उमेदवार रणवीर गायकवाड , सर्जेराव पाटील पेरिडकर,माजी आमदार सत्यजित पाटील, मानसिंग गायकवाड, कर्णसिंह गायकवाड मतदान स्थळी उपस्थित होते. तर आतापर्यत आजऱ्यात सेवा संस्था गटात ९९ टक्के मतदान झाले आहे. इतर सेवा संस्था गटात सकाळी सव्वादहापर्यंत ३० टक्के मतदान झाले. देसाई व चराटी गटाकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top