esakal | कोल्हापुरात रंगकर्मींच्या सांस्कृतिक कला बाजार आंदोलनाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात रंगकर्मींच्या सांस्कृतिक कला बाजार आंदोलनाला सुरुवात

कोल्हापुरात रंगकर्मींच्या सांस्कृतिक कला बाजार आंदोलनाला सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नाट्यगृहासह सांस्कृतिक कार्यक्रमांना नियम व अटींसह परवानगी मिळावी, या मागणीसाठी आज येथील रंगकर्मींनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातून सांस्कृतिक कला बाजार या अभिनव आंदोलनाला प्रारंभ केला. सलग आठ दिवस शहरातील प्रमुख चौकात हे आंदोलन होणार असून तेथे विविध कला प्रकार सादर होणार आहेत. दरम्यान, ‘कलाकारांना स्वेच्छा मदत करा..‘ अशी साद घालत परिसरातून मदत फेरीही काढली.

राज्यात नाट्यगृहांसह सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, यासाठी राज्यभर रंगकर्मींनी आंदोलन केले. पण, शासनाने पाच नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पुन्हा रंगकर्मी रस्त्यावर उतरले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक कला बाजार या आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. त्याशिवाय लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे निवेदनाव्दारेही याबाबतची मागणी केली आहे. मुकुंद सुतार, प्रसाद जमदग्नी, सागर बगाडे, सुनील घोरपडे, महेश भूतकर, महेश कदम, दिनेश माळी, समीर भोरे, रणजीत बुगले, वैदेही झुरळे, स्वानंद जाधव, स्मिता कोळी, मंजिरी देवण्णावर, सीमा मकोटे आदींसह रंगकर्मी आंदोलनात सहभागी झाले.

हेही वाचा: राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली; घाटात अतिवृष्टीचा इशारा

भर पावसात गीतगायन

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात भर पावसात रंगकर्मींनी गीतगायन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही गीतगायन करून सांस्कृतिक कला बाजार मांडला गेला. त्यानंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

loading image
go to top