esakal | उत्तूरला अपघातात मोडलेल्या खांबाची रंगलेय चर्चा

बोलून बातमी शोधा

Curiosity About The Broken Electricity Pillars In Uttur Kolhapur Marathi News

मुमेवाडी (ता. आजरा) येथे मोटर अपघातात महावितरणचा सिमेंट खांब मोडला. यानंतर महावितरणेने संबधीत मोटार चालकाकडून मोठी रक्कम वसूल केली. सिमेंटचा खांब मोडलेला असताना लोखंडी खांबाची रक्कम वसूल केली. याठिकाणी नवीन लोखंडी खांब उभा करण्याऐवजी जुना मोडलेला खांब आणून त्याला वेल्डींग मारून तो उभा केला. याची चर्चा सध्या उत्तूर परिसरात रंगली आहे. 

उत्तूरला अपघातात मोडलेल्या खांबाची रंगलेय चर्चा
sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तूर : मुमेवाडी (ता. आजरा) येथे मोटर अपघातात महावितरणचा सिमेंट खांब मोडला. यानंतर महावितरणेने संबधीत मोटार चालकाकडून मोठी रक्कम वसूल केली. सिमेंटचा खांब मोडलेला असताना लोखंडी खांबाची रक्कम वसूल केली. याठिकाणी नवीन लोखंडी खांब उभा करण्याऐवजी जुना मोडलेला खांब आणून त्याला वेल्डींग मारून तो उभा केला. याची चर्चा सध्या उत्तूर परिसरात रंगली आहे. 

गुरुवारी (ता.13) अचल माणगावकर हे आपल्या मोटारीतून सावंतवाडीहून कोल्हापूरकडे जात होते. मुमेवाडी (ता. आजरा) तिठ्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटून मोटार समोरच्या महावितरणच्या सिमेंटच्या खांबावर आदळली. यामध्ये खांब मोडून महावितरणचे नुकसान झाले. महावितरणने माणगावकर यांच्याकडे भरपाई द्या, अशी मागणी केली व 28 हजार 102 रुपये 14 पैशाचे कोटेशन दिले.

माणगावकर यांनी याबाबत बाजारात चौकशी केली. नवीन सिमेंट खांब 5 हजारपर्यंत व लोखंडी खांब बाजारात 9 हजारात उपलब्ध होतो, असे समजले. या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पैसे दिला नाही, तर तुम्हाला या ठिकाणहून गाडी नेता येणार नाही. शिवाय वीजपुरवठा बंद असल्याने नागरीक तुम्हाला त्रास देतील, असे सांगितले. 

यानंतर माणगावकर यांनी 25 हजार 500 रुपयाची रक्कम आपल्या खात्यावरून महावितरणकडे वर्ग केली. या ठिकाणी मात्र जुना लोखंडी मोडलेला खांब आणला त्याला वेल्डींग मारले व तो उभा केला. खांब उभा करताना जमीनीखाली पुरेसे कॉंक्रिट केले नाही यामुळे भविष्यात यापासून धोका आहे. लोखंडी खांब उभा केल्यावर मोडलेला सिमेंट पोल हटविण्याची तसदीही घेतली नाही. याची खमंग चर्चा सध्या सुरू आहे. 

याबाबत महाविरणचे सहाय्यक अभियंता संदीप गुरव यांच्यासी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""गावात दोन ठिकाणी कार्यक्रम होते व नवीन खांब उपलब्ध नव्हता यामुळे हा खांब उभारला आहे. झालेल्या कामाचे बिल मंजूरीसाठी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे. यानंतर संबधितांना त्याची पावती देण्यात येईल. 

कायदेतज्ञांचा सल्ला घेवून निर्णय 
याबाबत अचल माणगावकर यांच्यासी संपर्क साधला असता आपणाकडून महावितरणणे भरमसाठ रक्कम घेतली आहे. याबाबत कायदेतज्ञांचा सल्ला घेवून निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.