बाबुजी धिरे चलना 'हनी ट्रॅप' से जरा संभलना; सोशल मिडीयावर महिलांसोबतची मैत्री ठरेल डोकेदुखी

cyber cell department honey trap cases increased social media in kolhapur
cyber cell department honey trap cases increased social media in kolhapur
Updated on

कोल्हापूर : फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्ट, व्हॉट्‌सॲपवरील मैत्री सांभाळून करा; कारण अनोळखी तरुणी, महिलांच्या सोबत झालेली मैत्री ‘हनी ट्रॅप’ ठरू शकते. असे काही अनुभव सायबर क्राईमद्वारे पुढे आले आहेत. संबंधितांनी गुन्हे दाखल न करता तक्रार करून यातून बाहेर पडण्यासाठी पोलिसांचे मार्गदर्शन घेतले आहे. बदनामीच्या भीतीने अनेक जण यातून वाईट अनुभव आल्याचे सांगतात.

मैत्री किंवा फॉलोअरचा आकडा वाढविण्यासाठी येईल त्या फ्रेंड रिक्वेस्टला स्वीकारण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. यातूनच मैत्रिणींची ओळख आणि त्यानंतर एकमेकांशी वाढलेले चॅटिंग यातून संबंध जुळतात. पुढे एकमेकांच्या भेटीगाठी होतात आणि त्यातून नको ते घडते. मात्र, काही वेळा प्रत्यक्षात होणारे चॅटिंग व्हिडिओ कॉलपर्यंत जाते. याच व्हिडिओ कॉलने अनेकांचा घात होतो. व्हिडिओ कॉलिंगमध्ये नको त्या पद्धतीने आकर्षण वाढविले जाते. एक-दोन असे कॉल झाल्यानंतर पुढे त्याचा अतिरेक होतो आणि त्यानंतर ही फ्रेंडशिप ‘हनी ट्रॅप’मध्ये रूपांतरित होते. पुढे हेच कॉल रेकॉर्डिंग करून ‘जाळ्यात’ ओढले जाते.

बदनामीची भीती दाखविली जाते. यातून फसवणूक होते. मात्र, केलेल्या कृत्याबाबत पश्‍चात्ताप होत असतानाही भाष्य केले जात नाही. अब्रू जाईल, ही भीती संबंधितांना असते. यात अनेक जण गुरफटत जातात. अशा काही तक्रारी स्थानिक पोलिसांकडून सायबर क्राईम सेलकडे आल्या आहेत. ‘साहेब, गुन्हा दाखल करू नका, माझी फक्त यातून सुटका करा,’ अशी विनंती फसलेल्यांकडून होते, असे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

"सोशल मीडियाद्वारे मैत्री आणि पुढे हनी ट्रॅप झाल्याच्या महिन्यात दोन-तीन तक्रारी येतात; मात्र बदनामी होऊ नये म्हणून ‘आमची सुटका करा, गुन्हा दाखल करू नका,’ अशी विनंती केली जाते. त्यामुळे तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट हॅक झाले काय? त्याची माहिती इतर कोणाला मिळते काय? तुम्हाला ‘जाळ्यात’ ओढण्याचा प्रकार होत आहे काय? याची माहिती घ्या."

- संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com