कोल्हापूर : भरधाव ट्रक चालकाने सहा वाहनांना फरफटत नेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सायबर चौकात घडली. अपघाताच्या निमित्ताने गतवर्षी अनियंत्रित मोटारीने अनेक वाहनांना उडविलेल्या भीषण अपघाताची आठवण अनेकांना झाली. .प्रत्यक्षात या चौकात दररोजच मृत्यूचा खेळ चालतो. बेशिस्त वाहनधारकांकडून सिग्नल पडलेला असतानाही अचानक चौक ओलांडण्याची धडपड सुरू असते. गतिरोधकच बेपत्ता झाल्याने वाहनांची गती रोखणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे..Kolhapur Pune Accident : पुणे नवले पुलासारखा अपघात कोल्हापुरात; सायबर चौकात ५ वाहनांची भीषण धडक, नियंत्रणासाठी उपाययोजना होणार का?.सायबर चौक हा शहरातील वर्दळीचे ठिकाण समजले जाते. अपघातांच्या ब्लॅकस्पॉट म्हणूनही या चौकाची नोंद केली आहे. कर्नाटकातून शहरात येणारी पर्यटकांची वाहने, कागल व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीकडून येणारी अवजड वाहने, केएमटी बसेस, एसटी बसेस, रिक्षांची गर्दी रोजचीच आहे. .शिवाजी विद्यापीठ, सायबर महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, कृषी महाविद्यालयाकडे येणारे विद्यार्थी यांचीही यात भर पडते. चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असली तरी येते वाहतूक नियम मोडणारे ही काही कमी नसल्याचे चित्र आहे..Wardha Accident: कार अपघातात चिमुकल्यासह आई वडिलांचा मृत्यू; हिंगणघाट मार्गावरील नवोदय विद्यालयाजवळील घटना, मुलगा गंभीर.झाडात लपला सिग्नलचौकातील रिक्षा थांब्यालगत असलेला सिग्नल सध्या झाडाआड गेल्याने राजाराम महाविद्यालयाकडून येणाऱ्या वाहन चालकांना तो निटसा नजरेस पडत नाही. सिग्नल पडलेला असतानाही पुढे जाता येत नसल्याने इतर बाजूला थांबलेले दुचाकीस्वार अचानकपणे चौक ओलांडतात. यामुळे चौकात अपघातांना निमंत्रण मिळत आहे..रिक्षा थांबा, दुचाकींनी अडवला रस्ताडवरी वसाहतीच्या बाजूला असलेला रिक्षा थांबा, बाजूच्या इमारतीत झेरॉक्स, हॉटेल, खाद्यपदार्थ गाड्यांसमोर बेशिस्त दुचाकी पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. टाकाळ्याकडून येणाऱ्या मार्गावरही थांबणाऱ्या दुचाकींनी रस्त्या अडवला जात असल्याने चौकातील जागा व्यापून टाकली आहे..विरुद्ध दिशेने धोकादायक वाहनेराजाराम महाविद्यालय, सायबर महाविद्यालयातून बाहेर पडणारी काही वाहने विरुद्ध दिशेने चौकात येतात. सिग्नल पडलेला असल्याचे पाहून ही वाहने भरधाव वेगात येत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनधारकांची भंबेरी उडते. दुचाकीस्वारांसह अनेक चारचाकी चालकांकडूनही वाहतूक नियम पायदळी तुडवले जात आहेत..गतिरोधकांची आवश्यकताकेएसबीपी चौकाकडून येणाऱ्या अवजड वाहनांना गतिरोधकाचा कोणताही अडथळा नाही. तसेच चौकाकडे येणाऱ्या इतर मार्गांवरही गतिरोधकच दिसून येत नाहीत. डांबरीकरणामध्ये येथील गतिरोधक गायब झाल्याने पुन्हा ते बनविणे गरजेचे बनले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ‘रॅमलर’ सारखे गतिरोधक तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांची गती काहीप्रमाणात नियंत्रणात येईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.