Cyber Fraud
Cyber FraudSakal

Kolhapur Crime : सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तीन कोटी ५७ लाखांचा गंडा: 'मनी लॉन्ड्रींग'ची दाखवली भिती, नेमकं काय घडलं..

Kolhapur Crime : ‘ट्राय’ या केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून तिघांनी त्यांच्याकडून ही रक्कम घेतली. डोंगरे यांच्या खात्यातून एप्रिल व मे महिन्यांत हे व्यवहार झालेली दहा खाती गोठविण्याचे पत्र पोलिसांकडून संबंधित बॅंकांना पाठविण्यात आले.
Published on

कोल्हापूर : सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून लुबाडण्यात आलेली तीन कोटी ५७ लाखांची रक्कम दहा वेगवेगळ्या खात्यांवर पाठविण्यात आली आहे. केरळ, बिहार, उत्तर प्रदेशातील ही खाती असून, ती गोठविण्यासंबधी पत्रव्यवहार पोलिसांकडून करण्यात आला. संशयितांनी वापरलेल्या मोबाईल सीम कार्ड आधारेही अधिक तपासकामी सायबर पोलिसांकडूनही मदत घेतल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com