kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Kolhapur crime news: दानोळीतील २५ लाखांच्या खंडणी प्रकरणात धक्कादायक वळण समोर आले असून पीडितावर अमानुष छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
kolhapur Danoli killing case new update

kolhapur Danoli killing case new update

esakal

Updated on

Kolhapur Danoli ransom torture shocking case : दानोळी येथील घाऊक भाजीपाला व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४२) या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकारामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी राजदीप ताडे, मंथन चंदुरे (रा. दानोळी, ता. शिरोळ) यांना अटक केली आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित राजदीप ताडे, मंथन चंदुरे यांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही गावातील एका नागरिकाचे भाचे आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com