
जयसिंगपूर : लग्नासाठी ठार मारण्याची धमकी देऊन पतीच्या व्हॉट्सॲपवर व्हिडिओ पाठवून बदनामी केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील एका गावचे ग्रामपंचायत कर्मचारी शबगीर दस्तगीर जमादार यांच्यासह वडील दस्तगीर जमादार, आई शेहनाज जमादार व भाऊ रियाज जमादार याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.