इचलकरंजी : ऐन डिसेंबर महिन्यात बाजार समितीत कांद्याची आवक थांबल्याने दर झपाट्याने वाढले आहेत. सध्या कांद्याच्या प्रतिकिलो दरात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बाजारात आहे. त्यामुळे वाढत्या दरावर थेट परिणाम होत आहे. .सलग निवडणुका, नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष यामुळे कांद्याचे दर आणखी हाताबाहेर जातील, असे विक्रेत्यांचे मत आहे. नवीन कांद्याची आवक कमी असल्याने जुन्याच कांद्याला अधिक मागणी आहे..Mango Market Rate : फळांचा राजा हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल; प्रतिडझनाचा दर किती?.भाज्यांची आवक दिवसेंदिवस वाढतच असून, स्थानिकसह कर्नाटक आवक मोठी सुरू आहे. ओल्या वाटाणा आवकेत भर पडतच आहे. फुलबाजारात निशिगंधाचे दर चांगलेच वाढले आहेत. दरवर्षी या दिवसात मुहूर्त नसल्याने आटोक्यात येणारा फुलांचा हंगाम निवडणुकीमुळे बहरणार आहे. .त्यामुळे फुलांची आवक आतापासून वाढू लागली आहे. धान्यबाजारात ज्वारीचे दर तेजीत आहेत. फळबाजारात भाजी, लोणच्यासाठी मागणी असणाऱ्या काचरा फळाची यंदा आवक चांगली झाली आहे. .Kolhapur Market :शेवग्याची एक शेंग थेट ३० रुपयांना; कोल्हापूर बाजारात ६०० रुपये किलोने दरवाढीचा भडका .यंदा देशी आम्रफळाचीही आवक आणि मागणी वाढली आहे. गोड चिंच, ड्रॅगन, लिची, खजूर आदी परदेशी फळांची आवक फुल्ल आहे. हंगामी स्ट्रॉबेरीची आवक नसल्याने ग्राहकांना दरवाढ सहन करावी लागत आहे..प्रतिकिलो रुपये - भाजीपाला : टोमॅटो- ३० ते ४०, दोडका- ६० ते ८०, वांगी -८० ते १००, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ५० ते ६०, कोबी- २० ते २५, बटाटा - ३० ते ३५, कांदा -४० ते ५०, लसूण - ६० ते ८०, आले - ६० ते ८०, लिंबू - ३०० ते ४०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, हिरवा वाटाणा - ७० ते ९०, बीन्स - ८० ते १००, देशी गवार - १२० ते १६०, वरणा - ६० ते ८०, भेंडी - ८० ते १००, देशी काकडी - ६० ते ८०, काटा काकडी - ३० ते ४०, दुधी - ५० ते ६०, कांदापात, मेथी -१५ ते २०, भाज्या -८ ते १० रुपये पेंढी, शेवगा -२५ ते ३० रुपये नग..फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - २०० ते २५० गुलाब - ३०० ते ३५० , गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १५० ते २००.फळे : देशी सफरचंद - १५० ते १६०, विदेशी सफरचंद - ३०० ते ३५०, संत्री - १२० ते १५०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब - १५० ते ४००, चिकू- १२० ते १५०, पेरू - ८० ते १००, पपई- ३० ते ६०, मोर आवळा -१२० ते १५०, सीताफळ - १०० ते १५०, कलिंगड - १०० ते १२०, टरबूज -४० ते ६०, केळी - ४० ते ५० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १३० ते १५०, ड्रॅगन - १८० ते २००, चिंच- १०० ते १४०, राणी अननस - १२० ते १५०..खाद्यतेल : सरकी - १४५ ते १५०, शेंगतेल - १८० ते १९०, सोयाबीन - १४० ते १४५, पामतेल - १४० ते १४५, सूर्यफूल - १६० ते १६५.कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३५ ते ५५, बार्शी शाळू- ५० ते ६०, गहू - ३३ ते ४४, हरभराडाळ - ७२ ते ७५, तूरडाळ- ११० ते १२०, मूगडाळ -१०० ते ११०, मसूरडाळ - ८० ते ९०, उडीदडाळ - ११० ते १२० हरभरा- ७० ते ७५, मूग - ११० ते १३०, मटकी- १३० ते १५० मसूर- ७५ ते ८०, फुटाणाडाळ - ८५ ते ९०, चवळी- ९० ते १२०, हिरवा वाटाणा - १४०, छोला - १०० ते १३०. देशी संत्रीची आवक कमी.या हंगामात मुबलक प्रमाणात येणाऱ्या देशी संत्रीची आवक फार कमी प्रमाणात होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणारे हातगाड्यावरील स्टॉलही दुर्मीळ झाले आहेत. मागील महिन्याभरात चांगली सुरू झालेली संत्रीची आवक पुन्हा कोलमडल्याचे दिसत आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.