
Kolhapur Municipal Corporation Boundary Extension: महापालिका हद्दवाढीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्याचे काम मंत्रालयस्तरावर सुरू झाले आहे. यासाठी राज्याचे मुख्य सचिव असिम गुप्ता आणि सचिव के. गोविंदराज यांच्याकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाकडील म्हणणे आल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीपूर्वी हद्दवाढ, की त्यानंतर हे निश्चित होणार आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. अशा स्थितीत महापालिकेची हद्दवाढ करण्याचा निर्णय घेताना निवडणूक आयोगाचे म्हणणे विचारात घेणे आवश्यक आहे.