
कोल्हापूर : केंद्रीय जलआयोगाच्या नियमानुसार अलमट्टी व हिप्परगी धरणाचा पाणीसाठा ठेवला जात नाही, असे दिसते. परिणामी, कोल्हापुरातील नृसिंहवाडीमधील दत्त मंदिराजवळ पाणी आले. सांगलीतील राजापूर बंधारा बुडाला. अलमट्टी व हिप्परगीचे पाणी साठवण व विसर्गावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने केंद्रीय जल आयोग, कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.