मूर्तीच्या उंचीचे बंधन नकोच  कुंभार समाजाची मागणी 

मूर्तीच्या उंचीचे बंधन नकोच  कुंभार समाजाची मागणी 
Updated on: 

कोल्हापूर  : यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीच्या उंचीचे बंधन नको. कारण नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक मूर्ती तयार झाल्या असून, त्यांचे रंगकामही सुरू झाले आहे. गेल्या वर्षी महापुराचा मोठा फटका कुंभार समाजाला बसला आणि भविष्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर येणारी बंधने लक्षात घेता यंदा मूर्तीच्या उंचीचे बंधन नको. सध्या तयार असलेल्या मूर्तींच्या विक्रीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी आज कुंभार समाजाच्या झालेल्या बैठकीत केली. 
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे इतर सर्व नियम पाळून समाजातर्फे सध्या मूर्तिकाम सुरू असून मूर्ती मंडळांकडे सुपूर्द करतानाही या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी ग्वाही समाजातर्फे दिली. कुमावत क्रेडिट सोसायटीसह समाजाच्या पाचही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चार फुटांच्याच मूर्तीचा आग्रह धरला तर कुंभार बांधवांचे मोठे नुकसान होणार असून, ठरलेल्या स्वरूपातील व उंचीच्या मूर्तींची परंपरा जपणाऱ्या शहरातील मंडळांची संख्या मोठी आहे. अनेक मंडळांच्या मूर्तीवर अलंकार घातले जातात. त्यानुसार त्या त्या मंडळांच्या मूर्तीचा आकार पूर्वीपासून ठरला आहे. दसऱ्यापासूनच समाजातर्फे मूर्तिकामाला प्रारंभ होतो. सद्यस्थिती पाहता सर्व मंडळांच्या मूर्ती तयार झाल्या असून, आता रंगकामालाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही झाली. 
बैठकीला माजी महापौर मारुतराव कातवरे, संजय निगवेकर, प्रकाश सरवडेकर, संभाजी माजगावकर, विजय पुरेकर, उदय कुंभार, अनिल निगवेकर, सर्जेराव निगवेकर, अमोल माजगावकर, मारुती निगवेकर, चंद्रकांत गोरंबेकर, किरण माजगावकर आदी उपस्थित होते. 

कुंभार बांधवांचे म्हणणे: 
* गेल्या वर्षी महापुराने मोठे नुकसान झाले. 
* यंदा तयार मूर्ती शिल्लक राहिल्यास कर्जाचा डोंगर वाढणार. 
* पुढील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदीची शक्‍यता 
* परंपरेप्रमाणे मूर्तींवरील दागिन्यानुसार मूर्तीचा आकार व उंची 
* चारच लोक कुठलीही तयार मूर्ती उचलू शकतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election Voting Percentage Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Milk Union Election 2026 Ballot Paper Photos Viral
Kolhapur Mangav Murder Case
Gokul Election Controversy k p patil statement
Marathi News Esakal
www.esakal.com