पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) जुने बसस्थानक परिसरात ३१ मार्चला पहाटे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) हटवण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून आज पुन्हा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट मध्यस्थी करत या प्रकरणावर तोडगा काढला.