
सुनील पाटील
कोल्हापूर : साडेपाच हजार लोकसंख्या असणाऱ्या पिरवाडी (ता. करवीर) गावाला जलजीवन मिशनअंतर्गत चार कोटी २२ लाख ५१ हजार रुपयांची योजना राबवली जात आहे. अठरा महिन्यांचा कालावधी उलटून अठरा महिने झाले तरीही योजना पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नाही. त्यामुळे या गावाला विहिरीचे गढूळ पाणी पिऊन दिवस काढावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पाईप लाईनची गळती, दोनपैकी एका टाकीचे काम अपूर्ण राहिल्याने या कामात अनियमितता दिसून येत आहे.