
Kolhapur Dussehra
esakal
Kolhapur Festival Funding Issues : कोल्हापूर येथील शाही दसरा हा राज्याच्या प्रमुख महोत्सवाच्या यादीत समाविष्ट झाला खरा, मात्र या महोत्सवासाठी लागणाऱ्या निधीची अद्याप तरतूद झालेली नाही. तूर्तास राज्य शासनाने दोन लाखांचा निधी मंजूर केल्याची चर्चा आहे. जोपर्यंत निधी आणि दर्जेदार उपक्रम होणार नाहीत, तोपर्यंत या शाही दसऱ्याचे रूपांतर पर्यटन महोत्सवात होणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारकडून दसरा महोत्सवाला किती निधी येणार, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.