
उदयसिंग पाटील
शहराच्या तिसऱ्या सुधारित विकास योजनेत नवीन विकासकामांसाठी जागा उपलब्ध नाहीत. दुसरीकडे रस्त्यांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवरही महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी तसेच गुंठेवारी नियमितीकरणामुळे चार ठिकाणी घरे झाली आहेत. काही ठिकाणी रस्ता वळवण्याचाही प्रकार झाला आहे. नकाशावर रस्त्याची रुंदी दिसत असली तरी ती जागेवर कमी झाली आहे. नवीन योजनेत मूळची रुंदी दाखवावीच लागणार असल्याने या बांधकामांवर त्याची टांगती तलवार कायम आहे.