
सुनील पाटील
कोल्हापूर : शहर हद्दवाढीला पर्याय म्हणून राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची घोषणा केली. या प्राधिकरणामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभोवताली असणाऱ्या ४२ गावांचा समावेश केला आहे. गेल्या आठ वर्षांत प्राधिकरणाकडून या गावांतून कोट्यवधींचा महसूल जमा केला आहे,मात्र यापैकी एकाही गावाला विकास निधी म्हणून दमडीही दिलेली नाही.