
दिवाळीत देवगड हापूसची पहिली पेटी वाशी बाजारात दाखल
esakal
Fruit Market Devgad Hapus : वेळेआधीच यंदाच्या आंबा हंगामाचा मुहूर्त झाला आहे. तालुक्यातील पडवणे येथील एका आंबा बागायतदार शेतकऱ्याची सुमारे पाच डझनाची आंबा पेटी सोमवारी वाशी फळबाजारात रवाना झाली आहे. येथील खासगी आराम बसने ही पेटी फळबाजारात पाठवण्यात आली. उद्या (ता.२१) लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर ही पेटी फळबाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.