Kolhapur Smoke : कधीही न घडलेली घटना: देवठाणे खाणीतून धूर, भूगर्भशास्त्रज्ञांकडून तपासणी सुरू
Geological Activity : अनेक वर्षांपासून बंद असलेल्या देवठाणे–कसबा ठाणे रस्त्यालगतच्या खाणीतून अचानक धूर आणि गरम वाफा निघू लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषारी किंवा ज्वलनशील वायू असण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांनी खाणीकडे जाणे टाळले.
माजगाव : पन्हाळा तालुक्यातील देवठाणे-कसबा ठाणे रस्त्यालगतच्या डोंगर भागात अनेक वर्षांपूर्वी दगडाचे उत्खनन केलेल्या एका जुन्या खाणीतून काही दिवसांपासून गूढ धूर आणि गरम वाफामिश्रित उत्सर्जन होत आहे.