
कोल्हापूर: संकेश्वर ते आंबोली महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा गावांमधून जातो. यामुळे तेथे नेहमी वाहतूक कोंडी होते. यासाठी या महामार्गावर आजरा आणि संकेश्वर येथे बायपास करावा. तसेच या रस्त्यांची अन्य कामे करण्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले.