
Kolhapur Gokul MIlk Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या राजकरणाला आता ऊत येत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाष्य केल्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्यावर जाऊन महाडिक यांची भेट घेतली. तेथे काका-पुतण्यांनी गोकुळच्या पुढील राजकारणासाठी थेट दिल्लीपर्यंत शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.