कोरोनाचा न्युमोनिया आणि न्युमोनियात हा आहे फरक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Did corona mean pneumonia? Find out

नाही, तरीही उपचार न्युमोनियाचे झाल्याचे दिसून आले. 

न्युमोनिया आणि कोरोना 
सीटीस्कॅनिंगमध्ये प्राथमिक पाळीवर न्युमोनिया आहे, असे दिसून येते. अमेरिकेत प्रत्यक्षात न्युमोनियाचे औषध देऊन चालणार नाही, हे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. त्यांनी रक्त पातळ होण्याचे इंजेक्‍शन दिले आणि त्यानंतर या गुठळ्या कमी होऊ लागल्या. त्यातून त्यांचा मृत्युदर कमी आला. 

कोरोनाचा न्युमोनिया आणि न्युमोनियात हा आहे फरक

कोल्हापूर ः न्युमोनिया झाला म्हणून कोरोना होतो. छातीचे स्कॅनिंग केले आणि न्युमोनिया झाल्याचे दिसून आले. पुढे त्या रुग्णाला कोरोना झाला. सर्रास ही माहिती पुढे येत आहे. प्रत्यक्षात कोरोनाचा न्युमोनिया आणि सर्वसाधारण न्युमोनिया यात फरक आहे. न्युमोनियाची औषधे कोरोनासाठी चालत नाहीत, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

स्कॅनिंगमध्ये दिसते म्हणून... 
एखाद्या रुग्णाच्या छातीचे स्कॅनिंग केले तर तेथे फुफ्फुसाच्या बाजूला रक्ताच्या गुठळ्या दिसून येतात. त्यामुळे न्युमोनिया झाला आहे, असे समजून उपचार केले जात होते. इटली, अमेरिका येथेही कोरोनाच्या सुरवातीच्या काळात असे दिसून आले. रुग्णाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यावर त्याला व्हेंटिलेटर लावले. तरीही मृत्युदर वाढला. यानंतर इटलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे शवविच्छेदन केले. तेथे न्युमोनिया झालेला नाही, तरीही उपचार न्युमोनियाचे झाल्याचे दिसून आले. 

न्युमोनिया आणि कोरोना 
सीटीस्कॅनिंगमध्ये प्राथमिक पाळीवर न्युमोनिया आहे, असे दिसून येते. अमेरिकेत प्रत्यक्षात न्युमोनियाचे औषध देऊन चालणार नाही, हे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. त्यांनी रक्त पातळ होण्याचे इंजेक्‍शन दिले आणि त्यानंतर या गुठळ्या कमी होऊ लागल्या. त्यातून त्यांचा मृत्युदर कमी आला. 

"रेम्डीसेव्हर' आणि "इबोला'... 
आफ्रिकेत "इबोला'चा उद्रेक झाला होता. "इबोला' नावाच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी रेम्डीसेव्हर हे इंजेक्‍शन महत्त्वाचे ठरले. कोरोना आणि इबोला या दोन्ही विषाणूत 90 टक्के साम्य आहे, म्हणून अमेरिकेत या इंजेक्‍शनचा वापर केला. त्यानंतर मृत्युदर कमी झाला. त्यामुळे अमेरिकेचा संदर्भ घेऊन भारतात हे इंजेक्‍शन वापरले जाते. 

"फ्लॅबी फ्लू' गोळ्या काय आहेत? 
जपानमध्ये "जापनीज फ्लू'ची साथ होती, तेव्हा "फ्लॅबी फ्लू' हे गोळ्यांच्या स्वरुपातील औषध तेथे उपयोगी पडले. भारतात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसणाऱ्यांना दहा दिवस या गोळ्या दिल्या जातात. घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना फ्लॅबी फ्लू गोळ्या दिल्या जात आहेत. "रेम्डीसेव्हर' हे इंजेक्‍शन रुग्णालयात असताना दिले जाते. 

छातीचे सीटी स्कॅन केल्यानंतर फुफ्फुसाजवळील भागात रक्ताच्या गुठळ्या दिसून येतात. याचा अर्थ त्या रुग्णाला न्युमोनिया झाला, असे नाही. या गुठळ्या कमी करण्यासाठी न्युमोनियाची औषधे चालणार नाहीत. त्यासाठी रक्त पातळ होण्याऱ्या औषधांची गरज असते. विदेशातील अनुभव पाहून देशात रेम्डीसेव्हर इंजेक्‍शन आणि फ्लॅबी फ्लू गोळ्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा न्युमोनिया म्हणजे न्युमोनिया नव्हे. 
- डॉ. विजय हिराणी, हिमॅटॉलॉजिस्ट

संपादन  - यशवंत केसरकर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
loading image
go to top