Kolhapur Digital Arrest : डिजिटल अरेस्टमध्ये कोल्हापूराला १५ कोटींचा फटका; सुप्रीम कोर्टाने सर्व गुन्हे सीबीआयकडे सोपवले
Supreme Court Orders CBI : जिल्ह्यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल असून, जवळपास १५ कोटींची रक्कम हडपण्यात आली होती. हे गुन्हे सीबीआयकडे वर्ग झाल्यास तपासाला अधिक गती मिळणार आहे.चालू वर्षात डिजिटल अरेस्ट गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर : देशभरात वाढते डिजिटल अरेस्टचे गुन्हे आणि स्थानिक पोलिसांना तपासात येणारी मर्यादा लक्षात घेऊन देशभरातील सर्व गुन्हे सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.