आता पुन्हा क्षीरसागर यांनी या मार्गासाठी दंड थोपटल्यानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील या मार्गाची अधिसूचना यापूर्वीच रद्द झाल्याचे आज सांगितले.
कोल्हापूर : बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाचा (Shaktipeeth Highway) तिढा विधानसभा निवडणुकीनंतरही सुटलेला नाही. आता याच मुद्द्यावरून महायुतीमध्येच दोन मतप्रवाह असल्याचे आज दिसून आले. आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी शक्तिपीठ महामार्ग हा विकासासाठी आवश्यक असून सर्वांना विश्वासात घेऊन हा महामार्ग करणार, असे विधान केले.