Kolhapur Rain : आलमट्टीतून ७० हजार क्युसेकने विसर्ग वाढवला, कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पाऊस; हवामान विभागाकडून इशारा

Panchaganga River Water : पंचगंगेची पातळी २४ तासांत २५ फुटांवर स्थिर आहे. आलमट्टी धरणातही कृष्णा आणि घटप्रभा नदीत होणाऱ्या विसर्गाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने त्यांनी पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.
Kolhapur Rain
Kolhapur Rainesakal
Updated on

Kolhapur Weather Update : पावसाने जिल्ह्यात दोन दिवस विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रात पाऊस झाला आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून १९ हजार ९६९ इतका विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी २४ तासांत २५ फुटांपर्यंत गेली आहे. जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली आहेत.

कृष्णा आणि घटप्रभा नदीतून होणारा विसर्ग लक्षात घेऊन आलमट्टी धरणातूनही अधिक विसर्ग करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत धरणातून ५० हजार क्युसेक पाणी सोडले होते. त्यानंतर विसर्ग ७० हजार क्युसेक करण्यात आला. त्यामुळे आलमट्टी धरणाच्या पुढील क्षेत्राला सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला आज (ता.१९) हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com