निवडणुकीत मी भाजप सोबतच; बंद खोलीत बड्या कॉंग्रेस-भाजप नेत्यांत खलबतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

'आपली मैत्री अशीच घट्ट राहु दे, विधान परिषदेला मदत करा'

निवडणुकीत 'मी भाजप सोबतच'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वारणानगर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांची भेट झाली. कोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बंद खोलीत दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली.‘ आपली मैत्री अशीच घट्ट राहु दे, विधान परिषदेला मदत करा‘ अशी विनंती मंत्री पाटील यांनी कोरे यांना केली.

आमदार कोरे व मंत्री पाटील यांची मैत्री जिल्ह्याला ज्ञात आहे. गतवेळच्या निवडणूकीत आमदार कोरे यांनी मंत्री पाटील यांना पाठिंबा दिला होता. गोकूळच्या निवडणुकीतही आमदार कोरे यांनी पाटील, हसन मुश्रीफ यांच्या आघाडीत सहभागी होऊन अमरसिंह पाटील व करणसिंह गायकवाड यांना संचालक केले.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी

आमदार कोरे यांचे पन्हाळा शाहुवाडी, हातकणंगले मतदार संघासह जिल्ह्यांत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. आमदार कोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महाविकास आघाडीत आमदार कोरे यांचे विरोधक शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील असल्याने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाशी असलेल्या घरोब्यामुळे भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय कोरेंनी घेतल्याचे समजते. मात्र सतेज पाटील यांच्याशी असलेली मैत्री आणि महाडिक यांच्या विरोधातील लढाई. कोरे मैत्रीला तिलांजली देऊन महाडकांशी सलोखा करणार का? याचीच चर्चा सुरू असताना कोरे पाटील यांच्या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मी भाजप बरोबर - विनय कोरे

आमदार विनय कोरे म्हणाले, सतेज पाटील आणि माझी मैत्री ही राजकारण, निवडणूक यांच्या पलिकडची आहे. मात्र राज्यात मी भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतही मी भाजपबरोबरच राहाणार आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे.

loading image
go to top