कोल्हापुरकरांच्या माणुसकीने भागविली जातीय त्यांची भूक 

Distribution of lunch packets by kolhapur We Care Social Foundation
Distribution of lunch packets by kolhapur We Care Social Foundation
Updated on

कोल्हापूर : फिरस्ते, गरीब, गरजू व रोजंदारी करणाऱ्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून वुई केअर सोशल फाउंडेशनतर्फे जेवणाची पाकीट देण्यात येत आहेत. कोरोनाच्या संचारबंदीने त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून फाउंडेशनने त्यांच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. चोवीस दिवसांत  फाउंडेशनतर्फे २१०० जेवणाची पाकिटे वाटण्यात आली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात संचारबंदी जाहीर केली. त्यातून फिरस्ते, गरीब, गरजू व रोजंदारी कामगारांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. या प्रत्येक घटकाला जेवण देण्यासाठी समाजातील विविध संस्था संघटना पुढे आल्या. वुई केअर सोशल फाउंडेशननेही खारीचा वाटा उचलण्याची तयारी केली. फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करून ज्यांना आवश्यकता आहे, अशांना लोक सहभागातून जेवण व जीवनावश्यक साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेच्या सहकार्याने २८ मार्चपासून गरजू लोकांना मोफत जेवणाची पाकिटे पोचवण्याचा उपक्रम सुरु झाला.

 मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन रोड, दसरा चौक, सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंप रोड, शेठ रुईया विद्यालय व जिल्हा न्यायालय समोरील मुलींची शाळा येथे राहण्याची व्यवस्था केलेल्या तसेच पंचगंगा नदी परिसर, शिवाजी पूल परिसर, रिलायन्स मॉल भागातील रोजंदारी कामगार, गरीब, गरजू, फिरस्त्यांना दररोज जेवणाची पाकिटे पोचवली जातात. समाजातील दानशूर घटक या उपक्रमासाठी सहकार्य करण्याकरिता पुढे आले आहेत. त्यांच्याकडून उपक्रमासाठी मदत केली जात आहे.
 
सलमान मुजावर, इम्रान शेख, सुदर्शन पांढरे, मनिषा धमोणे, रूपेश कांबळे, अश्विनी पाटील, पूजा सावंत, प्रमोद पाटील, तौहीद शेख, साद शेख उपक्रमाकरिता  सहकार्य करत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त अवधुत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू केला आहे.


 हा उपक्रम ३ मेपर्यंत सुरू राहणार आहे. जेवणाची पाकिटे त्या त्या घटकांना आम्ही पोचवत आहोत. ते एक दिवसही उपाशी झोपणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतली आहे.

- इम्रान शेख (वुई केअर सोशल फाउंडेशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com