
कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये, ३५ हजार रुपये घरकुल अनुदान म्हणून आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घराच्या छतावर एक केव्ही मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार ६०० लाभार्थ्यांना सुमारे २०८ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडूनही ‘ही दिवाळी, आपल्या घरी’ अशी मोहीम राबवून दिवाळीपर्यंत ही घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.