Gargoti News: ‘दिव्यांग हे समाजाचे अविभाज्य घटक’; स्वावलंबनासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा निर्धार
Divyang Citizens: दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असून, त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
गारगोटी: ‘दिव्यांग हे समाजाचे अविभाज्य घटक असून, त्यांच्या स्वावलंबनासाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे जगावी, यासाठी अशा उपक्रमांची नित्तांत गरज आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.