महापालिकेचे पैसे पगारावर खर्च करता का? ; पालकमंत्री सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil

महापालिकेचे पैसे पगारावर खर्च करता का? ; पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय आहे, महापालिकेचा निधी केवळ पगारावरच खर्च करता का? अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील(guardian minister satej patil) यांनी आढावा बैठकीत केली. रस्त्यांसाठी तातडीने २५ कोटींची तरतूद करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. महापालिकेतील (kolhapur carporation) विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पाटील यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा: "गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त"

मंत्री पाटील म्हणाले, शहरात सध्या जी कामे सुरू आहेत, ती राज्य आणि केंद्र सरकाराच्या निधीतून सुरू आहेत. महापालिकेचे म्हणून कामे दिसत नाहीत. शहरात रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पालकमंत्री म्हणून मी जिल्हा नियोजन मंडळातून काही निधी एप्रिलपर्यंत देणारच आहे. प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे आणि संजय सरनाईक यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट केले. थेट पाइपलाइन योजनेतील जॅकवेल कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सध्या डी वॉटरीगचे काम सुरू आहे. २४पर्यंत प्रत्यक्ष जॅकवेल कामाला सुरुवात होईल.

हेही वाचा: चार लाख लोकसंख्येच्या इचलकरंजीत महिला स्वच्छतागृहांचा विषय दुर्लक्षित का?

ताराराणी चौक फायर स्टेशनसाठी ४० लाख

ताराराणी चौक फायर स्टेशनची इमारत धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीसाठी १ कोटी ७० लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे दिला होता. यापैकी १ कोटींचा निधी मंजूर आहे. हे काम लवकरच सुरू होईल. पेठांत आगीसारखी दुर्घटना घडल्यास तेथे गाडी जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी छोटी गाडी जाऊ शकते यासाठी ४० लाख मंजूर आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapursatej patil
loading image
go to top