
Kolhapur Police Warning Ignored : लाईफमार्क रिअल इस्टेट ॲन्ड डेव्हलपर्स कंपनीत गुंतवणुकीवर दरमहा दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टर दांपत्यासह पाच जणांची एक कोटीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान घडला आहे. याबाबत डॉ. मनोज सुनील गायकवाड (वय ३८, रा. शाहू सर्कल, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह आणखीन तिघांनी कंपनीत गुंतवणूक केली होती.