रस्त्याच्या कामात तडजोड नको ; कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या सडेतोड प्रतिक्रिया 

Don’t compromise on road work; The overwhelming reaction of the citizens of Kolhapur city
Don’t compromise on road work; The overwhelming reaction of the citizens of Kolhapur city
Updated on

कोल्हापूर  : जो कंत्राटदार शहरातील रस्ते करणार आहे, त्या कंत्राटदाराचे नाव, पत्ता व मोबाईल नंबरचे पक्के फलक रस्त्यावर लावले पाहिजेत. रस्त्याचा दर्जा तपासणारी प्रामाणिक यंत्रणा ठेवली पाहिजे. जे कंत्राटदार किंवा ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून त्याने केलेल्या रस्त्यासाठी पाच वर्षाची हमीचा करार करून घेतला पाहिजे. रस्ते केले अनेक वर्षही टिकतील, तर खराब झालेल्या रस्त्यांचा जाब लोकांनीच विचारला पाहिजे, रस्त्याच्या कामात तडजोड नको, अशा सडेतोड प्रतिक्रिया कोल्हापूरवासीयांनी दिल्या. 
शहरातील रस्ते करण्यासाठी 40 कोटींचा निधी मिळाला आहे. रस्ते करताना डांबर दर्जेदार आणि शासकीय रिफायनरीतून आलेले असावे. निकृष्ट डांबरामुळे चार-पाच महिन्यांतच रस्त्याची चाळण होते. हा आजवरचा शहरवासीयांचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर आज "सकाळ'मधून प्रसिध्द झालेल्या "निकृष्ट डांबराने रस्त्याला काळिमा' या वृत्तानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
शहरासाठी 40 कोटी निधीतून दर्जेदार झालेच पाहिजे. कोणत्या तरी कंत्राटदार टक्केवारी मिळावी म्हणून निकृष्ट दर्जाचे रस्ते करत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे. शहरातील संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. 

* शहरातील रस्त्यांसाठी लोकांची अपेक्षा : 
- रस्ता ठेकेदाराच्या नावचा फलक रस्त्यावर उभारावा. 
- रस्त्याच्या टेंडरची झेरॉक्‍स सुपरवायझरकडे असावी. 
- पाच ते दहा वर्षाची हमी असावी 
- रस्ता खराब झाल्यास लोकांनीच जाब विचारावा 
- दर्जा तपासणारी प्रामाणिक यंत्रणा असावी 
- कंत्राटदारांचे फोन, पत्ता असणारे फलक लावावेत 
- भ्रष्ट कंत्राटदारांना काम देऊ नये 
- भ्रष्टाचारमुक्त कार्यप्रणाली अंगीकारावी 

कोरोनाच्या कठीण काळातही कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले आहेत, मात्र हे रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ होण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाऊ नये. यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी दर्जेदार रस्त्यांसाठी स्व:ता लक्ष घालावे. 
- हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com