

Dr DY Patil Inspiring Political Career From Cooperative Leader to Governor of Three Indian States
sakal
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कसबा बावडा, ता. करवीर हे मूळ गाव. वडील वारकरी संप्रदायाचे पाईक तर आई गृहिणी. अशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या सभापतिपदापासून केली. त्यानंतर महापालिकेचे नगरसेवक, पुढे दोन वेळा आमदार, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांचे अध्यक्ष ते दोन राज्यांचे राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.