"डॉ.गेल यांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीला दिशा देणारी कार्यकर्त्या गमावल्या"

कोल्हापुरातील सर्व पुरोगामी व परिवर्तनवादी पक्ष, संघटनांच्यावतीने आजोजित सभा डॉ.गेल यांना आदरांजली
परिवर्तनवादी पक्ष
परिवर्तनवादी पक्षsakal

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तत्वज्ञ डॉ.गेल ऑम्व्हेट महान अभ्यासक आणि कार्यकर्त्या होत्या. त्या गेल्या नंतर जगभरातून त्यांच्या प्रती अभिवादनपर प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेसारख्या श्रीमंत, प्रगत देशात जन्मलेली महिला महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीला दिशा देणारी कार्यकर्त्या गमावल्या. अशी भावना श्रमिक मुक्ती दलाचे जेष्ठ कार्यकर्ते धनाजी गुरव यांनी व्यक्त केली. ते गेल ऑमव्हेट यांच्या अभिवादन सभेत सभेत बोलत होते.शेतकरी कामगार पक्ष कार्यालय कोल्हापुरातील सर्व पुरोगामी व परिवर्तनवादी पक्ष, संघटनांच्यावतीने ही सभा आयोजित केली गेली होती.

परिवर्तनवादी पक्ष
कलिवडे ग्रामस्थांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

धनाजी गुरव पुढे म्हणाले,जगातल्या बहूतेक प्रत्येक ग्रंथालयात डॉ.गेल यांनी लिहलेली पुस्तके आहेत. डॉ.गेल यांच्या विचार आणि व्यवहार यात फरक नव्हता. अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर डॉ.गेल या मांडणी करत होत्या. याच मांडणी मुळे त्यांच्या संशोधनाला, विचारांना अधिमान्यता मिळाली. महात्मा फुले का महत्त्वाचे आहेत ? मार्क्सवादी दृष्टीकोणातून सर्वोत्कृष्ट मांडणी डॉ.गेल यांनी केली.

माकपचे सुभाष जाधव म्हणाले, डॉ.गेल यांच जाण्याने चळवळीची हानी झाली. एका नवख्या समाजामध्ये येत दीन दलित, आदिवासी, कष्टकर्यांचा अभ्यास करत त्यांच्या लढण्याचं काम डॉ.गेल यांनी केलं. श्रमीकांच्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान देत चळवळीला कसं पुढे नेता येईल, यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले.

परिवर्तनवादी पक्ष
भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी सामाजिक न्याय हक्क परिषद

शेकापचे डॉ.टी.एस पाटील म्हणाले, महात्मा फुलेंच क्रांतिकारी कार्य जगभर पोहचवण्याचे काम डॉ.गेल यांनी केले. मार्क्स,लेनिन यांच्या नंतर डाव्यांना महात्मा फुलेंना जवळ करावं लागलं ते डॉ.गेल यांच्या संशोधनामुळे.डॉ.गेल यांच्या मांडणीचा,संशोधनाचा विचार सर्व पक्षांनी करावा हीच श्रद्धांजली ठरेल.

अभ्यासक शेखर चैतन्य म्हणाले, डॉ.गेल यांनी बुद्ध विचारांची, भारतीय स्त्रीवादाची मांडणी त्यांनी नव्याने केली. बुद्धाकडे नव्याने पाहण्याचे दृष्टी डॉ.गेल यांनी संशोधनातून मांडली. पॉपुलर लिटरेचर लिहण्याची प्रेरणा ही डॉ. गेल यांनी दिली. स्वाती कृष्णा म्हणाल्या, डॉ.गेल खुप विद्वान पण साध्या होत्या. आपल्या विचारांशी ठाम राहत त्यांनी इथे कार्य केले. त्यांचे काम आदर्शवत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत काम करायला बळ मिळेल. राजवैभव शोभा रामचंद्र म्हणाले, डॉ.गेल यांचे लिखाण मराठीत येणं गरजेच आहे. तरुणांना त्यांचे संशोधन,लिखान वाचता आले तर ते मार्गदर्शक ठरेल. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

परिवर्तनवादी पक्ष
बाळूमामांच्या वारसांमध्ये वाद; पाहा व्हिडिओ

या वेळी प्रकाश जाधव, बी.एल. बरगे, डॉ.विजया पाटील, दिलीपकुमार जाधव, सुभाष गुरव, शफिक देसाई, अतुल वाघ, ऐश्वर्या कावेरी संजय, डॉ.अनमोल कोठाडीया, आकाश पाटील, इम्रान मुल्ला, बाबुराव कदम, हर्षल जाधव, रवी जाधव, संभाजी जगदाळे, अशोक जाधव आदी कार्यकर्त्यांनी डॉ.गेल ऑम्व्हेट यांना आदरांजली वाहिली. गौतम कांबळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com