२०२१-२२ चा डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विद्यापीठाच्या बुधवारी होणाऱ्या वर्धापनदिनात पुरस्कार देण्यात येईल
 डी. वाय. पाटील विद्यापीठ
डी. वाय. पाटील विद्यापीठsakal

कोल्हापूर : कोल्हापूर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून २०२१-२२ चा डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांना नुकताच जाहीर झाला. विद्यापीठाच्या बुधवारी (ता. १ सप्टेंबर) होणाऱ्या वर्धापनदिनात पुरस्कार देण्यात येईल. सकाळी नऊ वाजता कार्यक्रमास सुरवात होईल.

 डी. वाय. पाटील विद्यापीठ
कलिवडे ग्रामस्थांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

प्रा. पाटील यांनी दीर्घकाळ शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याशिवाय विद्यापीठ व सामाजिक संस्था तद्वतच शासकीय विविध मंडळांवर सदस्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य होते, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते

 डी. वाय. पाटील विद्यापीठ
"डॉ.गेल यांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीला दिशा देणारी कार्यकर्त्या गमावल्या"

इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे ते संचालक सदस्य आहेत. त्यांची इंग्रजी व मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्रातून व मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन पदव्या प्राप्त केल्या आहेत. निवडीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श सेवक पुरस्कार, विज्ञानाचार्य, कार्यरत्न, उत्कृष्ट संशोधक, गुणवंत विद्यार्थी असेही पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 डी. वाय. पाटील विद्यापीठ
'वरद बाळा, ये रे परत.!'; वरदच्या फोटोपूजनवेळी आई-वडिलांची आर्त हाक

कार्यक्रमात प्रा. पाटील यांच्या अर्थाभिव्यक्ती' व 'Essays in Economics Persuasian' या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com