
Zilla Parishad Kolhapur : गेल्या तीन वर्षांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील गट-गणांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करून या निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियेला सुरुवात झाली. आता या आराखड्यावरील हरकती, त्यावरील सुनावणी व अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल, पण इच्छुकांना खरी प्रतीक्षा असणार आहे ती आरक्षण सोडतीची. गेल्या दोन निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून ही सोडत काढण्यात येणार आहे.