
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर या ठिकाणी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिरांमध्ये दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पारपंरिक पोशाखच परिधान करावा असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केलंय. या निर्णयाबाबत अधिकृत निवेदन देवस्थान समितीकडून जारी करण्यात आलंय.