विहिरीत बुडालेल्या 'त्या' मुलाचा मृतदेह सापडला, उदगावातील घटना

संकेत हा गुरुवारी रात्री सातच्या सुमारास विहिरीत पडल्याचा संशय आहे.
crime news in udagav shirol
crime news in udagav shirol
Updated on
Summary

संकेत हा गुरुवारी रात्री सातच्या सुमारास विहिरीत पडल्याचा संशय आहे.

जयसिंगपूर - उदगाव (ता. शिरोळ) येथील साखळे माळ्यातील दुसरीत शिकणारा संकेत राजेश बामणे (वय 8) हा गुरुवारी रात्री सातच्या सुमारास विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, संकेतचा मृतदेह सापडला असून एनडीआरएफ टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाने हा मृतदेह शोधला आहे.

crime news in udagav shirol
'शिंदे, फडणवीसांनी सरकार बनवण्यासाठी घेतलेली संधी जगजाहीर'

मिळालेली माहिती अशी की, संकेत हा गुरुवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास शाळेतून घरी आला होता. शाळेतून आल्यावर अभ्यास करत बसला होता. दरम्यान, सातच्या सुमारास खेळून येतो असे सांगून घरातून बाहेर पडला, रात्री दहापर्यंत तो घरी आला नाही. यानंतर संकेतच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला असता तो सापडला नाही. गुरुवारी रात्रीपासून संकेतचे शोधकार्य सुरू होते. आज सकाळपासून पुन्हा एनडीआरएफसह, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह ७ पथकेांनी शोधकार्य सुरु केले होते. दरम्यान, या दोन्ही पथकांना आता त्याचा मृतदेह मिळाला आहे.

दरम्यान, कुटुंबियांनी शोधाशोध करुनही संकेत न सापडल्याने घराच्यांनी जयसिंगपूर पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह २० कर्मचारी दाखल होऊन शोधाशोध सुरु केली. यावेळी घराजवळ असलेल्या विहिरीच्या काठावर संकेत याचा शर्ट व हाफ पॅंट आढळून आली. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह २० हुन अधिक पोलिस कर्मचारी संकेतचा शोध घेत होते. यावेळी मृतदेह सापडताच त्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता.

crime news in udagav shirol
TV न्यूज अँकर रोहित रंजनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com