Drug Addition : ‘बॉण्ड’च्या नशेतून शाळकरी पिढीही धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drug Addition
‘बॉण्ड’च्या नशेतून शाळकरी पिढीही धोक्यात

Drug Addition : ‘बॉण्ड’च्या नशेतून शाळकरी पिढीही धोक्यात

कोल्हापूर, : ‘बॉण्ड’सारख्या नशांतून शाळकरी मुलांची पिढी धोक्यात आली. जिल्ह्यातील एका शाळेतील ३५ विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याची माहिती पुढे येत आहे. शासकीय पातळीवर याची दखल घेण्यात आली असून, संबंधित कार्यालयासाठी याबाबत व्यवहारही झाल्याचे जबाबदार व्यक्तींकडून सांगण्यात आले. याचबरोबर ‘स्टिकर’सारखी नशाही परप्रांतातून जिल्ह्यात येत असल्याचे सांगण्यात येते. हे रोखण्यासाठी सर्वच पातळ्यांवर दक्षता घेणे आता महत्त्वाचे ठरत आहे.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

एका प्लास्टिक पिशवीत ‘बॉण्ड’सारखे जेल टाकून ते हुंगल्याने नशा होते. हा प्रकार शाळकरी मुलांत वाढत असल्याची माहिती पुढे येत आहे. कोल्हापूर शहरापासून २५ ते ३० किलोमीटरवर कष्टकऱ्यांच्या वस्तीत एका शाळेतील ३५ विद्यार्थी याच्या आहारी गेल्याची माहिती विश्‍वसनीय व्यक्तींकडून मिळाली. या शाळेतील एका विद्यार्थ्याने कुटुंबीयांना दिलेल्या त्रासातून पुढे याची शहानिशा झाली. तेव्हा त्या विद्यार्थ्याला ‘बॉण्ड’चे व्यसन असल्याची माहिती समोर आली. शाळेपर्यंत हे प्रकरण पोचले, मात्र बदनामी नको म्हणून पुढे पोलिसांकडे तक्रार गेली नाही. मात्र, ही घटना गंभीर असल्याचे जबाबदार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शाळा परिसरातील टपऱ्या, पानपट्ट्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या यातून बॉण्ड विद्यार्थ्यांच्या हाती मिळत असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. या नशेत शाळकरी विद्यार्थीही भरडले असल्याचे दिसून येते. अनेक विद्यार्थी नशेच्या आहारी जात असल्याचे दिसून आले. अनेक शाळांच्या परिसरात टपऱ्यांसह खाद्यपदार्थांच्या गाड्या दिसून येत आहेत. प्रशासनानेही याची दखल घेतली पाहिजे.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

शाळा परिसरात कशाची विक्री होते, हे पाहिले पाहिजे

भूक कमी लागणे, वेळेवर जेवण न घेणे, चिडचिड करणे, वेळेवर झोप न येणे, इतरांवर अधिकार गाजविणे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणे, प्रसंगी बेकायदेशीर कृत्य करणे अशा काही गोष्टी नशेतून पुढे येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पालक, पोलिस, शाळा प्रशासन यांनी शाळेच्या परिसरात कशाची विक्री होते, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

परप्रांतातील ‘स्टिकर’ नशा

‘स्टिकर’सारखी परप्रांतात असलेली नशाही जिल्ह्यात आडमार्गाने येत असल्याची माहिती काही जाणकारांनी दिली. मास्कसारखा हा ‘स्टिकर’ लावला आणि दहा मिनिटांनी काढल्यावर नशा होते. नशा करण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. परप्रांतातून येणाऱ्या काहींकडे असे स्टिकर दिसून येत असल्याचेही सांगण्यात येते.

"शाळकरी मुलेही नशेच्या चक्रात अडकत आहेत. एका विद्यार्थ्याच्या मानसिकतेतून याची माहिती पुढे आली. यावर तातडीने उपाय झाले पाहिजेत. विशेष करून शाळा परिसरात असलेल्या टपऱ्यांची दखल सर्वच पातळ्यांवर घेतली पाहिजे. तेथे काय विक्री होते, याकडे गांभीर्यानेपाहिले पाहिजे."

- ॲड. दिलशाद मुजावर, सामाजिक कार्यकर्त्या

loading image
go to top