

मध्यप्रदेशातून आलेल्या चारचाकी वाहनातील दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तब्बल एक किलो अफूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
esakal
Ichalkaranji Ganja Charas MD Drugs : इचलकरंजी शहरात चरस, गांजा, एमडी अशा घातक नशेरी पदार्थांनंतर आता अफूचा साठा सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास थोरात चौक परिसरात अचूक माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली. यावेळी मध्यप्रदेशातून आलेल्या चारचाकी वाहनातील दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तब्बल एक किलो अफूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.