Woman Police Kolhapur : कोल्हापुरातील मुख्य चौकात मद्यधुंद तरुणाकडून महिला पोलिसाला दमदाटी, वाद झाला अन्...

Drunken Misbehavior Kolhapur : दमदाटी करणाऱ्या तरुणाची दुचाकी वाहतूक शाखेकडून हस्तगत करण्यात आली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
Woman Police Kolhapur
Woman Police Kolhapuresakal
Updated on

Youth Misbehaving With Police : लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर चौकात एका दुचाकीवरून मद्यधुंद अवस्थेत जाणाऱ्या तिघा तरुणांना अडविणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलिसाला दमदाटी करण्याचा प्रकार आज सायंकाळी घडला. यातील दोघे जण पसार झाले. तर दमदाटी करणाऱ्या तरुणाची दुचाकी वाहतूक शाखेकडून हस्तगत करण्यात आली. तो सोमवार पेठेतील रहिवासी असून त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, वादावादीमुळे बघ्यांची गर्दी झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com