

UAE Gift of rs. 26000
ESakal
कोल्हापूर : अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर युद्धाने रौद्र रूप घेतले आहे. या संघर्षाचे हवाई वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहेत. इराण-इस्रायल हल्ल्यामुळे मुंबई पुण्याहून परदेशी जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे दुबईत अनेक भारतीय पर्यटक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. अडकलेल्या सर्व भारतीय पर्यटकांना परत आणण्यासाठी कंपन्या धडपडत असून काही प्रवासी सुखरुपरित्या भारतात आले आहेत.