
कोल्हापूर : चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक असणाऱ्या उच्च दाबाच्या भुयारी वीजवाहिनीचे महामार्गावरील ५०० मीटर लांबीचे काम थांबले आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत केएमटीचे पीएम ई-बसच्या डेपो प्रकल्पाच्या पूर्ततेचा मुहूर्त हुकणार आहे. दसऱ्यापर्यंत सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता असून त्यामुळे १०० ई-बसचे आगमन लांबणार आहे.