Earthquake : सांगली जिल्ह्यातील जत भूकंपानं हादरलं; भर पावसात जाणवले धक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake in Jat

जिल्ह्यात पाऊस सुरु असतानाच जत भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले.

सांगली जिल्ह्यातील जत भूकंपानं हादरलं; भर पावसात जाणवले धक्के

माडग्याळ (जत ) : सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना शुक्रवारी बहुतांश भागात पावसानं हजेरी लावलीय. शिराळा, वाळवा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला, तर मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्यात रिमझिम सुरू राहिली. मात्र, पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांत पावसानं ओढ दिलीय.

दरम्यान, जिल्ह्यात पाऊस सुरु असतानाच पूर्व जत भागात आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. त्यामुळं जतच्या पूर्व भागात भीतीचं वातवरण पसरलंय. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असून अद्याप कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती समोर आलीय. जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात (Karnataka Border Area) आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.

हेही वाचा: योगींचा विरोधकांना धक्का; द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

माडग्याळ, सोन्याळ, करजगी, बेलोडगी, बोर्गी, गिरगाव, कोंतेवबोबलाद, संख व मोरबगी आदी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू विजयपूर (Bijapur) जिल्ह्यात विजयपूर पासून पंधरा किलोमीटर असल्याचं सांगण्यात येतंय. सदरच्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याचं समजतंय.

Web Title: Earthquake In Jat Area Of Sangli District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..