esakal | कोल्हापूरला भुकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांत भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

earthqauke

कोल्हापूरला भुकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांत भीतीचे वातावरण

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : चांदोली परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी भुकंपाचा भुकंपाचा हलका धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र जिल्ह्याच्या पश्चिमेला १९ किलोमीटरवर तर भुगर्भात ३८ किलोमीटरवर आहे. यामध्ये कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही. अशी माहिती वारणा पाटबंधारे विभागाचे शिखाधिकारी यांनी दिली. याबातचे शासकीय पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

जिल्ह्यातील नागरिक महापुराच्या संकटातून बाहेर पडत असताचा मंगळवारी रात्री भुकंपाचा धक्का बसला. भुकंपाची तीव्रता फारशी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. याबाबत प्रसिद्ध झालेल्या पत्रकातील माहितीनुसार वारणावती नदी पासून केंद्रबिदूचे अंतर सुमारे २०० किलोमिटर होते. शहरासह ग्रामिण भागातही भुकंपाचा धक्का जाणवला.

हेही वाचा: मुलांच्या मनावरचा ताण शोधा! 13 प्रश्नांमधूनच मिळू शकते उत्तर

मध्यरात्री अचानक जमिनीला कंप जाणवल्याने बचावात्मक उपाय म्हणून नागरिक घरातून बाहेर आले. मात्र भुकंपाची तीव्रता जास्त नव्हती. मात्र यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण होते. भुगर्भातील अंतर्गत हलचालींमुळेच हा सौम्य धक्का बसला असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. शहरासह करवीर, पन्हाळा आणि शाहुवाडी या भागात हा धक्का जाणवला.

loading image
go to top